Uddhav Thackeray : शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर...उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार
Uddhav Thackeray : शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले
Uddhav Thackeray : शिवसेना (Shivsena) एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाहीचं रक्षण करावं ही निवडणूक आयोगाला विनंती आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली.
Uddhav Thackeray on Shinde Group : पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही
पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद आहे. त्यामुळं शिवसेना एकच आहे एकच राहणार आहे. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव टाकरे म्हणाले. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे असेही ते म्हणाले.
शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता
शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आमच्या शपथपत्रावरही आक्षेप घेतला गेला आहे. लोकशाहीचं रक्षण करावं ही निवडणूक आयोगाला विनंती आहे. पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण करतो. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य
निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नाही. जनतेच्या मनात एक संभ्रम आहे. त्यामुळं शिवसैनिकाला हे सांगणे गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. क्रमवारीनुसार सर्वोच्च न्यायलायने निर्णय आधी द्यायला हवा असेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे. त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत आहे. बाकीच्या ठिकाणी नाही. शिंदे गटाने विभागप्रमुख हे पद निर्माण केलं आहे. निवडणूक आयोगानं ज्या ज्या गोष्टी सांगतिल्या त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्हाला पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सांगितली होती. ती देखील आम्ही सादर केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: