एक्स्प्लोर
साताऱ्यात भीषण अपघात, मालवाहतूक एसटी बस आठशे फूट दरीत कोसळली
महाबळेश्वर सातारा रोडवर काळाकडा येथून मालवाहतूक एसटी बस दरीत कोसळली. या गाडीत फक्त चालक आणि वाहक होते. ते दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

Photo
सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताने खळबळ उडाली. महाबळेश्वर सातारा रोडवर काळाकडा येथून मालवाहतूक एसटी बस दरीत कोसळली. या गाडीत फक्त चालक आणि वाहक होते. ते दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही बस सुमारे आठशे फूट खोल दरीत कोसळली.
ग्रामस्थ आणि ट्रेकर्स यांच्या मदतीतून दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसटी बस दरीत गेल्याच्या माहिती मिळतात सर्वच यंत्रणांची झोप उडाली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक























