एक्स्प्लोर

Sangli Politics: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा आज महाराष्ट्र दौरा; सांगलीत भव्य सत्कार, काँग्रेसचा महानिर्धार मेळावा आणि शक्तीप्रदर्शन

Sangli Politics: कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेला चेहरा आता काँग्रेस महाराष्ट्रामध्येही वापरण्याच्या तयारीत आहे.

Maharashtra Sangli Politics: कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री (Karnataka CM) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांचा भव्य सत्कार आणि महानिर्धार मेळावा आज सांगलीमध्ये पार पडणार आहे. काँग्रेसच्या (Congress)  कर्नाटकमधील अभूतपूर्व विजयानंतर सिद्धरमय्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सिद्धरमय्या यांचा महाराष्ट्रात हा पहिलाच सत्कार सोहळा असणार आहे, जो सांगलीमध्ये संपन्न होणार आहे.  

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेला चेहरा आता काँग्रेस महाराष्ट्रामध्येही वापरण्याच्या तयारीत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या राजमती क्रीडांगणावर हा महानिर्धार मेळावा संपन्न होणार आहे. यानिमित्तानं काँग्रेसकडून आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. 

सांगली जिल्ह्यात जे पिकतं ते महाराष्ट्रात पसरतं, त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची दमदार सुरुवात करण्याचा आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाकडून असणार आहे, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी बोलून दाखवला आहे. या सत्काराच्या निमित्तानं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली शहरातून जंगी रॅलीदेखील काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात, राज्यातील इतर पदाधिकारी आणि काँग्रेस नेते उपस्थित होणार आहेत. 

सांगतीली राजकीय परिस्थिती काय? 

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लोकसभेची जागा गेली होती. विशाल पाटलांनी ही निवडणूक लढवली आणि दोन नंबरची मतं देखील मिळवली. आता मात्र काँग्रेसकडे ही जागा लोकसभेची राहावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची देखील या सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेवर नजर आहे.  प्रत्यक्षपणे जरी या जागेची अजून राष्ट्रवादी मागणी करत नसली तरी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीकडे हे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ जावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. मात्र सांगलीची लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. आमचा या जागेवर पूर्ण अधिकार आहे. ती कोणत्याही एका विशिष्ट गटाची नसून पूर्ण पक्षाची आहे, असे विश्वजित कदम म्हणाले आहेत. यावर जयंत पाटील यांनी मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र लोकसभा किंवा विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असं सांगत सावध भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे सांगली लोकसभेवर पुन्हा भाजपकडून आपल्यालाच तिकीट मिळेल या आशेनं विद्यमान खासदार संजय काका पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर आपल्या विरोधात होते, पण आता गोपीचंद भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची मतं देखील आपल्यालाच मिळतील असा देखील विश्वास संजय काका पाटील यांना आहे. तर जत्रा आली म्हणून सराव करणाऱ्यांमधला मी पैलवान नाही, निवडून येण्यासाठी कायम लोकांमध्ये राहावं लागतं, असं म्हणत संजयकाका पाटलांनी कॉंग्रेसचे लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या विशाल पाटलांना टोला हाणला आहे. या टीकेला विशाल पाटील यांनी अजून तरी समोर न येता सोशल मीडियाद्वारे भाजपच्या खासदारांनी नऊ वर्षात काय केलं असा सवाल करत आहे. नाकी नऊ आलेले नऊ वर्ष असं कॅम्पेन राबवत खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केलं, असा सवाल विचारत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget