Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 418 नवे रुग्ण आढळले, 36 जणांचा मृत्यू
Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 418 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 428 नव्या रुग्णांची नोद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 वर पोहचली आहे. यापैकी 64 लाख 45 हजार 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 40 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97. 54 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 71 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 896 वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 4 लाख 74 हजार 928 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 कोटी 62 लाख 83 हजार 551 लस देण्यात आल्या आहेत. यात पहिला आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.
संबंधित बातम्या-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
