एक्स्प्लोर

Ramdas Athawale : 'बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे', रामदास आठवलेंची शिवसेनेतील बंडावर कविता

एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट म्हणजे आता खरी शिवसेना आहे असे मत आठवलेंनी व्यक्त केले. आठवले म्हणाले, महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, बंडाळीमुळे शिवसेनेतील असंतोष बाहेर पडला आहे.

 सांगली : आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आता  एकनाथ शिंदे यांच्या बंडावर कविता केली आहे. "एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत  एकनाथ शिंदे" अशा शब्दात कविता करून एकनाथ शिंदे भाजपसोबत येणार असल्याचा दावा आठवलेंनी केला आहे.  सांगलीतील सामुहिक आत्महत्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हैसाळला भेट दिल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट म्हणजे आता खरी शिवसेना आहे असे मत आठवलेंनी व्यक्त केले. आठवले म्हणाले, महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, बंडाळीमुळे शिवसेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले.  शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपसोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदापायी उध्दव ठाकरे यांची दिशाभूल केली. यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेपेक्षा आताची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानतो. भाजपने आता सरकार स्थापन करण्यासाठी  पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रतील परिस्थिती  सध्या अस्थिर आहे, शिंदे यांनी केलेले बंड शिवसेनेला हा जबरदस्त झटका आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आहे.

शिवसेनेतील बंडावर रामदास आठवलेंची कविता

'ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे  बंद केलेले आहे धंदे;  त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे 

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे  आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत  एकनाथ शिंदे

राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवाराचा  बळीचा बकरा बनविण्याचा डाव

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांना उभे करून बळीचा बकरा बनविण्याचा  संजय राऊत यांचा डाव होता. मात्र पवार मुरब्बी राजकारणी असल्याने त्यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले असेही आठवले म्हणाले.

अजित पवार यांच्या सारखा एकनाथ शिंदे यांचा प्रयोग फसणार नाही

 अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस याच्या सोबत शपथविधी घेताना नियोजन केले नव्हते. शपथविधीला जाण्याअगोदर आपल्या सोबत किती आमदार येतील याची चाचपणी अजित पवार यांनी करायला हवी होती. त्यामुळे त्यावेळी सरकार स्थापन्याचा प्रयोग फसला. मात्र अजित पवार यांच्या सारखा  एकनाथ शिंदे यांचा हा प्रयोग फसणार नाही असे आठवले म्हणालेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तरMurlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणारTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 एप्रिल  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9  AM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
Embed widget