एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Maharashtra Rain Updates Live : मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Updates Live : मुंबईसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला आहे.  

LIVE

Key Events
Maharashtra Rain Updates Live : मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Background

Maharashtra Rain Updates Live : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर ओसरला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पावसाची स्थिती काय असू शकते याबाबतचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितला आहे. आजपासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.   

 कोल्हापूर पाऊस

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित 6 व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी 18  फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या पावसाचे आगार असणाऱ्या तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे. 

पावसाचा अंदाज काय 

संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाची उघडीप मिळू शकते असा अंदाज त्यांनी  वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात आजपासून (23 ऑगस्ट) तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीपच जाणवेल अशी माहिती ही खुळे यांनी दिली आहे.

10:53 AM (IST)  •  24 Aug 2022

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं पवना धरणातून चालू असलेला विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता 3 हजार 500 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget