Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा तर अनेक ठिकाणी सतर्कतेचा आदेश
Rain Update : पुण्यात हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील पुराची परिस्थिती बघता 16 जुलै पर्यंत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार (Marashtra Rain) पाऊस पडल्याचं चित्र आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
पुण्यात हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसअतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विनाकारण घराबाहेर पडू, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पुण्याचं खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं विसर्ग वाढवला. सकाळपासून 4 हजार 708 क्युसेक वेगानं विसर्ग सुरु.
Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील शाळांना 16 जुलैपर्यंत सुट्टी
गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाची स्थिती व पुराची परिस्थिती बघता 16 जुलै पर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 12 पैकी 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी चमोर्शी तालुकात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 10 मार्ग सध्या बंद अवस्थेत आहे. गोसेखुर्द धरणातून 12,282 अधिक क्युमेक्स जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना दिला अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Amravati Rain Update : अमरावतीच्या गांधी चौक भागात एक दुमजली इमारत कोसळली
अमरावतीच्या गांधी चौक भागात एक दुमजली इमारत कोसळली आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळतानाची दृश्य कॅमेरात कैद. कोसळण्याआधीच इमारत रिकामी केल्यानं जीवितहानी टळली. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दूध डेअरीचं मोठं नुकसान झाले आहे.
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर
दमदार पावसामुळे नांदेड जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणीपातळी शंभर टक्क्यांवर आले आहे. पाणीसाठा वाढल्यानं विष्णपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडले आहे. गेल्या दोन दिवसात नांदेड जिल्ह्यात 184 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडचा माहूरगड दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे. पैनगंगेला पूर आल्याने विदर्भातून माहूरकडे येणारी वाहतूकही ठप्प.
Yavatmal Rain Update : यवतमाळकरांची चिंता मिटली, निळोणा धरण ओव्हर फ्लो
यवतमाळ शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण शंभर टक्के भरले असून यवतमाळकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. हे धरण त्यांच्या क्षमतेच्या 100 टक्के भरून ओव्हर फ्लो झाले आहे. मागील 6 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे धरण भरल्याने यवतमाळकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Jalgaon Rain Update : जळगावच्या हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले
तापी आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे जळगावच्या हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले. धरणातून साडेतीन हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पाऊस वाढत असल्यानं विसर्गही वाढण्याची शक्यता. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Kokan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती. अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे एक्स्प्रेस खोळंबली होती. कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे..
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणुस्कुरा
घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
Chandrapur Rain Update : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात इरई नदीचं पाणी शिरलं
चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात इरई नदीचं पाणी शिरलंय. त्यामुळे रहमतनगर परिसरातील काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. इरई धरणाचे सात दरवाजे उघडल्यानं पाणी पातळीत वाढ झालीय.
Maharashtra School : राज्यातील अनेक शाळांनी सुट्टी
ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे,
Palghar Rain : पालघरमधील वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या 10 कामगारांची 15 तासांनंतर सुटका
पालघरच्या वैतरणा नदीला आलेल्या पुरात 10 कामगार अडकले होते. मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते अडकून पडले होते. 15 तासांनंतर सुटका झाली. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले.