एक्स्प्लोर

Rain Update: परतीच्या पावसाची दाणादाण! शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

Rain Update: राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने(Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. दरम्यान, आज देखील राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल (Heavy Rain) असा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या परतीच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हे शेतातील पिकांना बसला असून ऐन कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केलं आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसाचा फटका धान पिकांना बसला असून या शेतपिकांची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  दरम्यान, गोंदियाच्या बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे. बोरगाव, मरारटोली, सीलेगाव या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुऱ्हाडी येथे जावं लागतं.

मात्र मधातच बाघोली या गावाच्या लगत एक नाला पडतो. नाल्यावरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी पूर चढत असतो. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अजूनही पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षणासाठी जात असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. 

अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भातपीक जमीनदोस्त

मागील तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळं शेतात डौलत असलेलं आणि कापणीला आलेलं भातपीक या पावसामुळं जमीनदोस्त झालं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हा चौथांदा पावसाचा जबर फटका शेतकऱ्यांना बसलाय. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात करण्यात आलेली असून आता केवळ पंचनामे नको तर, थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddiqui Case Update :बाबा सिद्दिकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं, झिशान सिद्दिकींचा जबाबABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Embed widget