एक्स्प्लोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, चक्रीवादळाचा राज्याच्या वातावरणावरही परिणाम

Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झालं असून आता पुन्हा एकदा राज्यात 24 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात (Cyclone Michaung) रूपांतर झालं आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठं नुकसान झालं असून आता पुन्हा एकदा राज्यात 24 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस

'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणामी राज्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पावसाचा अंदाज

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 पथकं तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती (NCMC) च्या बैठकीत चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget