Maharashtra Rain Live Updates : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Rain : राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.
विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचे संकेत नसल्याचे हवामान खात्याच्या अहवालातून दिसून येत आहे.
Aurangabad: जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
Aurangabad News: वरील धरणातील आवक पाहता जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रामधून गोदावरी नदीपात्रात 1589 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी धरण प्रशासनाने केला आहे. जायकवाडीत अजूनही 51 हजार 721 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणाचा पाणीसाठा 78.14 टक्के झाला असून, जिवंत पाणीसाठा 1696.473 दलघमी एवढा झाला आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी मुख्य दरवाज्यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणाचा विसर्ग 6 वाजता बंद करणार
खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असणारा 856 क्युसेक विसर्ग सकाळी 6 वाजता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे
चंद्रपूर :
वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजुरा-बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. इरई धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात देखील चार हा रस्ता दिवस बंद होता. बल्लापूर-राजुरा मार्ग, हा मार्ग बंद झाल्याने पुन्हा एकदा चंद्रपूर-तेलंगाणा वाहतूक ठप्प झाली आहे.
अकोला : अकोला - अकोट मुख्य रस्ता 18 तासांपासून बंद
अकोला - अकोट मुख्य रस्ता 18 तासांपासून बंद आहे. या मार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीला पूर आलाय. या पुरामूळ सध्या गांधीग्रामच्या पुलावरून 10 ते 12 फुट पाणी वाहत आहे. तर जिल्ह्यातील अकोट शेगाव अंदुरा मार्ग जोडणारा बंद आहे. पूर्णा नदीचा फटका या रस्त्याला बसलाय. अकोला जिल्ह्यात सुमारे 100 हून अधिक घरांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेतात पाणी असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. सद्यस्थितीत लोकांना स्थलांतरित करावा असं कुठलेही वातावरण नाहीये. तरी नदीकाठच्या नागरिकांना गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Aurangabad: औरंगाबाद शहरात पुन्हा पावसाला सुरवात
Aurangabad Rain Update: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज पुन्हा शहरातील काही भागात पावसाला सुरवात झाली आहे. शहरातील आकाशवाणी चौकात जोरदार पाऊस सुरु आहे. तर शहरातील इतर भागात सुद्धा कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.