एक्स्प्लोर

Maharashtra Rain : 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज, विदर्भात यलो अलर्ट

26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. अशातच आता 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला आहे. तर कोकणात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता देकील हवामान विभागानं वर्तवली आहे. 

कोकण विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

कोकणात आणि विदर्भात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात 26 सप्टेंबरला नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातुर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देकील 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे तसेच अहमदनगरमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेणार

 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं  दिली आहे. राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा 24 टक्के पाऊस अधिक झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळेABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget