एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात गारपीट होणार, किती तारखेपर्यंत पाऊस पडणार?

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावासमुळं जनजीवन विस्कळी तझालं आहे. तसेच शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे.

Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावासमुळं जनजीवन विस्कळी तझालं आहे. तसेच शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होणार आहे. 

माणिकारव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबरपासून पुढील दोन दिवस म्हणजे 19 ते 20  ऑक्टोबर (शनिवार- रविवार) दरम्यान खान्देश (धुळे, नंदूरबार आणि जळगाव) नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 राज्यात गारपीटीची शक्यता कशामुळे निर्माण झाली?

i) रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर खोल अरबी समुद्रात व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बं. उपसागरातील दोन्हीही समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून सह्याद्रीच्या पूर्व बाजूला संपूर्ण मध्य महाराष्ट्रादरम्यान होणारा वाऱ्यांचा संयोग.

ii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून 5.8 किमी. उंचावर तयार झालेला ' व्हर्टिकल विंड शिअर ' (एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा व्हर्टिकल शिअर झोन)
            
iii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून 5.8 किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून 20 डिग्री अक्षवृत्त दक्षिणे पर्यंत पर्यन्त सरकलेले बळकट पश्चिमी वारे ह्या वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नाशिकच्या (Nashik) चांदवड (Chandwad) शहर व परिसरात परतीच्या पावसानं धुमाकूल घातलाय. चांदवडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सुमारे दोन तास कोसळत असलेल्या पावसानं शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. रस्त्यावरुन गुडघ्याएवढं पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसली आहे, तसेच या भागातील काही जनावरे वाहून गेली आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. राहूड भागात जोरदार पाऊस झाल्याने राहुडच्या बंधाऱ्याने धोक्याची पातळी गाठल्याने  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे, काढणीला आलेला मका, कांदा,सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. चांदवडसह देवळा, कळवण, मनमाड, नांदगाव आदी भागातही जोरदार पाऊस सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Amravati: धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावतीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना कोणता कानमंत्र दिला?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Amravati: धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावतीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना कोणता कानमंत्र दिला?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Embed widget