Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस झाला आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तसेच पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातही हलका पाऊस झाला. दरम्यान, मागच्या तीन ते चार दिवसापासून सुरु असणारा जोरदार पाऊस कमी झाला आहे. नदी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात पावसाची शक्यता
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या पावसामुळं विदर्भातील काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवस पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. पण स्वच्छ सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी दिली आहे.
कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं नद्या आणि कॅनॉल पात्रातील सततचा विसर्ग तसाच कायम ठेवावा लागणार आहे.
विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज
विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर जाणवणार आहे. गुजराथ राज्य आणि दक्षिण राजस्थानमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून बद्री-केदार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच गया, जगन्नाथ-पुरी, कोलकातामधील पर्यटन क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्य पावसाची सतत धार सुरूच, वाहतुकीवर परिणाम
जायकवाडी धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील 7 गावांचा संपर्क तुटला
जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. अनेक गावांनाही पाण्यानं वेढले असून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील 7 गावांचा संपर्क तुटला आहे. गंगाखेडच्या सुनेगाव येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरुन पाणी जात असल्याने सुनेगाव, सायाळा, धारखेड, मुळी, नागठाणा, अंगलगाव, धसाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. सुनेगाव येथील इंद्रायणी नदीवरील पूल हा कमी उंचीचा असल्यानं कायम या 7 गावांना अडचणींचा सामना करावा लागतो. आजही सकाळपासून येथील गावकऱ्यांना जीव मुठीत धरुन या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.