(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Koyta Gang : जिथं दहशत, तिथंच शिक्षा ! "कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे" म्हणणाऱ्या टोळीची पोलिसांनी भर चौकातून काढली धिंड
Pune Koyta Gang : पुणे पोलिसांकडून कोयता गँगची भर रस्त्यात धिंड काढण्यात आली आहे. तसेच आता कोयता गँगच्या विरोधता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Koyta Gang : पुणे पोलिसांनी (Pune Police) आता कोयता गँगला (Koyata Gang) चांगलाच धडा शिकवायचं ठरवलं आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत संपायचं नाव घेत नाही. मात्र "कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे" अशी धमकी देणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी काढली धिंड काढली आहे. मुंढवा पोलिसांनी मुंढवा परिसरातच त्यांची धिंड काढली आहे. चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने आलेल्या युवकांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
लाइफ केअर मेडिकलचे मालक संतोष लुनिया यांच्यावर काही अज्ञातांनी शनिवारी कोयत्याने हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी CCTV चेक केले आणि या टोळीला पकडून जिथे दहशत माजवली तिथेच धिंड काढली. कॅडबरी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या युवकाने लुनिया यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. 18 ते 20 वयोगटातील या टोळक्याने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते. याचा तपास करत असताना मुंढवा पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले आणि आता त्या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली. पुणे पोलिसांकडून कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांची धिंड काढण्याचे सत्र सुरू आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयगा गँगची भररस्त्य़ात धिंड काढली आहे. तसेच यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची थेट धिंड...
पुण्यातल्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्यानं झालेल्या हल्ल्यानंतर आता पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. हातात कोयते घेऊन पुण्यात विविध ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून आता धिंड काढण्यात येत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्याच मित्राकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. त्या घटनेनं पुण्याचं पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं. आता तुम्ही हातात कोयता घ्याच, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.