एक्स्प्लोर

Maharashtra Politics Shivsena : महिला शिवसैनिक आक्रमक; शाब्दिक बाचाबाचीनंतर बंडखोर आमदाराचा काढता पाय

Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचेच पडसाद आज अंबरनाथमध्ये दिसून आले.

Maharashtra Politics Shivsena  : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले असताना देखील अजूनही त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेतील अंतर्गत वादाचे पडसाद आज अंबरनाथमध्ये दिसून आले. अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची महिला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महिला शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आमदार किणीकर यांना काढता पाय घ्यावा लागला. 

आमदार किणीकर हे आज विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी अंबरनाथ पालिकेत आले होते. पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. मात्र याच वेळी आमदार किणीकर यांनी शिवसेना महिला आघाडीला न विचारता थेट मुख्याधिकारी यांची केबिन गाठली, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला. 
 
या बैठकीला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना का बोलवण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. आम्ही शिवसैनिक नाहीत का असा सवालही त्यांनी केला. तुम्ही स्वत: वेगळा गट केलात, इथं बैठकाही वेगळ्या घेत आहात असा प्रश्न या महिला शिवसैनिकांनी केला. यावेळी आमदार किणीकर आपली बाजू मांडत होते. मात्र, महिला शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहता आमदारांनी काढता पाय घेतला. आमदार पालिका कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात ही घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आमदार किणीकर यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटले. 

अंबरनाथमध्ये झालेल्या या सगळया प्रकरणानंतर येत्या काळात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या बंडखोर आमदार, त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अशाच प्रकारची धुमश्चक्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारपासून शिंदे गटातील अनेक आमदार आपल्या मतदारसंघात परतले आहेत. या बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या जात आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Shivsena : शिवसेनेच्या आमदारांनंतर आता 'हे' खासदारही देणार उद्धव ठाकरेंना धक्का?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget