एक्स्प्लोर

Shivsena On Veer Savarkar Controversy: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावर शिवसेनेने राहुल गांधींचे कान टोचले , भाजपवरही निशाणा

Shivsena On Veer Savarkar Controversy: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेने आपली भूमिका स्पष्ट केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावले आहे.

Shivsena On Veer Savarkar Controversy: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे मागितलेल्या माफीच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे कान टोचले आहेत. तर, दुसरीकडे भाजप-शिंदे गटावरही निशाणाही साधला. सावरकर माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्यानं  काँग्रेस नेत्यांची अवस्था अवघडल्यासारखी झाली असेल असे शिवसेनेने म्हटले. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिनाम्यावरून  शिवसेनेने मुखपत्र 'सामना'मधून आपली भूमिका मांडताना राहुल गांधी यांना सुनावताना भाजप-शिंदे गटाच्या सावरकर प्रेमावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेने म्हटले की, ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच, असे सामनाने म्हटले. 

नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले. राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एपंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसत असल्याचे सांगत भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला. 

सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी

सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते असे सांगताना शिवसेनेने सावरकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले. ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावलेले या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी 10 वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही, असेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 

सावरकरांनी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारकडे दया याचिका करायला हरकत नाही हे महात्मा गांधींचेही मत होते. निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला असतो. त्यानुसार सावरकरांनी सरकारकडे याचिका केली. सावरकरांच्या सहा दया याचिका सरकारने फेटाळून लावल्या हेसुद्धा तितकेच खरे. अटी व शर्तींवर पुढे सावरकरांची सुटका झाली तरी त्यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर होती. सावरकर सरकारकडून उपजीविकेसाठी पेन्शन घेत होते ते अत्यंत तुटपुंजे होते. यावर स्वतंत्रपणे बोलता येईल असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

ब्रिटिश साम्राज्याचा पाया जेवढा महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीने हलवला, तेवढाच तो सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या लढय़ामुळेही उखडला. महात्मा गांधींनाही त्याची कल्पना होती. पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावताच ‘‘तोपर्यंत तुमची सत्ता राहील काय?’’ असा भेदक प्रश्न विचारून साखळदंडात जखडलेले सावरकर अंदमानकडे निघालेल्या बोटीत चढले. काय हा आत्मविश्वास! हे सर्व इतिहासात नोंदवले आहे, पण इतिहासाशी वैर अलीकडे सगळय़ांनीच घेतलेले दिसत असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेनेने केले आहे. 

संघ-भाजपवर टीकास्त्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता. तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले की, मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱयाची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नसल्याचेही शिवसेनेने म्हटले. 

राहुल गांधींना हे टाळता आले असते

देशातील द्वेष, द्वेषाचे समाजमनात पसरत चाललेले विष, महागाई, बेरोजगारी या मुद्यायांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण 15 किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जनता चालत असते. राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे. राहुल गांधी यांचे श्रम, कष्ट त्यामागे असल्याचे कौतुक शिवसेनेने केले. मात्र, त्याचवेळी शिवसेनेने राहुल गांधी यांना सुनावले आहे.  अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व सर्व केलेल्यावर पाणी पडते. असे का व्हावे? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील असेही शिवसेनेने स्पष्ट सांगितले आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget