एक्स्प्लोर

Shivsena : शिंदे गटास सत्ता देण्या इतकं भाजपचं मन मोठं नाही, तेच सरकार पाडणार; शिवसेनेचा निशाणा

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध केल्यानंतर आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला आहे.

Shivsena : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिवसेनेने मुखपत्र 'सामना'तील अग्रलेखातून निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही, असे सामनाने म्हटले आहे.

विधीमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर सहा महिन्यांसाठी सरकारला कोणताही धोका नाही असे समजणारे भ्रमात असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने बंडखोर गटास भाजप पुरस्कृत गट म्हटले आहे. भाजपपुरस्कृत शिंदे गटाच्या सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली आहे. यात आनंद किंवा दुःख वाटावे असे काही नाही. ज्या परिस्थितीत शिंदे सरकार बनवले आहे त्यामागची प्रेरणास्थळे पाहता महाराष्ट्रात दुसरे काही घडेल याची खात्री नव्हती, असे शिवसेनेने म्हटले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला.  फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते  असे अग्रलेखात म्हटले. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये. महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यात तत्त्व, नैतिकता आणि विचारांचा कोठे लवलेशही दिसत नसल्याचे शिवसेनेने म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले. बहुमत चाचणीच्या वेळीस अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार सभागृहात पोहचले नाहीत याचे आश्चर्य वाटले असल्याचे शिवसेनेने म्हटले. 

आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असे भासवून चाळीसेक लोक विधिमंडळातून बाहेर पडतात. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले असल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला. 

ही तर भाजपची कपटी खेळी 

शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिंदे हे शिवसेना-भाजप ‘युती’चे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांत भ्रम पसरवला जातो. हीच तर भाजपची कपटी खेळी असल्याचे शिवसेनेने म्हटले. 2014 साली याच लोकांनी ‘युती’ तोडली. 2019 साली याच लोकांनी ‘युती’चा म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मग आता फडणवीस कोणत्या युतीची शेखी मिरवत आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. 

सत्तेसाठी झालेले बंड 

शिवसेना आमदारांचे हे बंड नसून उठाव असल्याचे विधानसभेत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावरही सामनात भाष्य करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत असा टोलाही लगावला आहे.  बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा असल्याचे शिवसेनेने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषणUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman Full Video:निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा, संपूर्ण बजेटUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman on Income Tax Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवलीUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली,  कॅन्सरच्या औषधांचा समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Embed widget