एक्स्प्लोर

Raj Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंच पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य, म्हणाले...

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

Raj Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले. शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटात शिवसेना बंडखोरीच्या वादावर भाष्य केले. आज शिवतीर्थावर मोठी गर्दी आहे. कोणीतरी आपल्याला संपलेला पक्ष म्हटले होते. ज्यांनी संपलेला पक्ष म्हटले त्यांची आजची अवस्था काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पक्षातून बाहेर पडलो त्यावेळी माझा वाद हा विठ्ठलाशी नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे म्हटले होतो. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, त्यात मला वाटेकरी व्हायचं नाही असेही म्हणालो होतो याची आठवण राज यांनी करून दिली. 

फक्त धनुष्यबाण नव्हे तर शिवधनुष्यबाण

राज ठाकरे यांनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही असेही त्यांनी म्हटले. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपल की नाही माहित नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

उद्धव यांना लहान भावाबद्दल आपुलकी नाही: नांदगावकर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मोठा आरोप केला आहे.  उद्धव ठाकरे यांना लहान भावाबद्दल कधीही आपुलकी वाटली नाही. त्यामुळेच त्यांनी युतीचा प्रस्ताव नाकारला असल्याचा गौप्यस्फोट नांदगावकर यांनी सभेला संबोधित करताना केला. दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती, असेही नांदगावकर यांनी म्हटले. मनसेच्या जाहीर सभेला संबोधित करताना बाळा नांदगावकर यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, दोन भाऊ एकत्र यावे अशी इच्छा होती.  2017 मध्ये युतीचा प्रस्ताव घेऊन आपण मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी तुम्ही मोठा भाऊ, आम्ही लहान भाऊ अशी भूमिका घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी युतीला नकार दिला. तुमच्या मनात लहान भावाबद्दल आपुलकी नव्हती, वैषम्य वाटत होते अशी घणाघाती टीका नांदगावकर यांनी केली.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana | मुलांच्या खात्यात पैसे आले, लाडक्या बहिणीनं केले परत Special ReportSantosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special ReportSudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वरSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Embed widget