एक्स्प्लोर

Nana Patole : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नसून गुजरातचे मुख्यमंत्री, नाना पटोलेंचा टोला

Nana Patole : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

Nana Patole On CM Eknath Shinde : भाजपचे (bjp) देशातील आणि महाराष्ट्रतील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, याला वेगळं प्रमाणपत्र देण्याचे गरज नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, म्हणूनच राज्यातील प्रकल्प हे गुजरातला पाठवले जात असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. शेतकरी, युवक, बेरोजगार या सर्वांसाठी हे सरकार संकट असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. काँग्रेस नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने होती आणि पुढेही राहणार असल्याचे पटोले म्हणाले. ते यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकार म्हणजे सर्वांवरचं संकट

भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकरा आहे. त्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. ते बोलतील काय, त्यांचा अजेंडा काय हे आपल्याला सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केलं आहे की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे हस्तक आहे. त्यामुळं ते राज्याचे मुख्यमंत्री नसून गुजरातचे मुख्यमंत्री असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. त्यामुळेचं विदर्भात होणारे प्रकल्प गुजरातला जात असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. हे सरकार म्हणजे सर्वांवरच संकट आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन नाना पटोलेंनी केलं. तुम्ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नका, तुम्हाला न्याय देण्याची व्यवस्था निश्चित होईल. तुम्ही काँग्रेसच्या पाठिशी उभं राहा असं आवाहन पटोले यांनी केलं.

फॉक्सकॉन वेदांतांनंतर  टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर

फॉक्सकॉन वेदांता (vedanta foxconn) आणि टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus) महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आधीच सरकार आणि आताचा सरकार एकमेकांवर त्याचा खापर फोडत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन आम्ही काय काय प्रयत्न केले हे सांगत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर  C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताराध्यांवर टीकास्त्र सोडलं आहे तर सत्ताधाऱ्यांनी हा प्रकल्प आधीच गुजरातला गेल्याचं सांगितलं आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला (Gujarat) गेल्यानंतर नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते  झालं. त्यामुळं फॉक्सकॉननंतर दुसरा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. दरम्यान, एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्यावर' राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 22 हजार कोटींचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडं पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nana Patole: दुसऱ्यांचे घर तोडणं हा भाजपचा धंदा; नाना पटोलेंची खोचक टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget