एक्स्प्लोर

Sanjay Raut Exclusive: विरोधकांवर तपास यंत्रणांची कारवाई; संसदीय समितीसमोर मुद्दा उपस्थित करणार: संजय राऊत

Sanjay Raut: विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut: मागील काही वर्षात विरोधकांवर ईडी, (ED) सीबीआय (CBI) सारख्या केंद्रीय  तपास यंत्रणांच्या मार्फत होत असलेल्या कारवाईचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित करणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी सांगितले. 'एबीपी न्यूज' सोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर 100 दिवसांनी राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन दिला. या जामिनाच्या आदेशात कोर्टाने ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. 

संजय राऊत यांनी सांगितले की, मागील काही वर्षात देशातील केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय हेतूने अटक सत्र सुरू केले आहे. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या या कारवाईची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. या पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नसल्याचे राऊत यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. देश हा राज्यघटनेच्या चौकटीत चालतो. संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. सध्या संविधानाची पायमल्ली होत असल्याचे त्यांनी म्हटले. 

पंतप्रधान मोदींची घेणार भेट

संजय राऊत यांनी म्हटले की, ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात माझा खूप छळ झाला. मी लवकरच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा तुरुंगातील अनुभव आणि माझ्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात आली याची माहिती देणार आहे. 

संसदेचे अधिवेशन वादळी ठरणार?

संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन वादळची ठरण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टाने ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगितले. ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. कर्नाटक, तेलंगणा, झारखंडमध्येही विरोधकांवर ईडी मार्फत कारवाई सुरू आहे. ही कारवाई विरोधी पक्षांना दडपण्यासाठी सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो. आता, संजय राऊत यांच्या जामीन आदेशात कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाच्या आधारे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Heavy Rain : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी केसरकरांची घोषणाABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 08 July 2024 Marathi NewsWadala And Panvel Railway Station : वडाळा, पनवेल रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकले, पावसामुळे हालABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 08 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
Embed widget