Rohit Patil : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ, साहेबांच्या नेतृत्वात एक नंबरचा पक्ष करु : रोहित पाटील
Rohit Patil : शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करु असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी व्यक्त केला.
Rohit Patil : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करु असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी काम करणार असल्याचे रोहित पाटील म्हणाले. सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे पाटील म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केलं आहे. यावेळी रोहित पाटील बोलत होते.
सध्या प्रसंग बाका असताना आपण सर्वांना एकत्र भूमिका घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपती सिवाजी महाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका घेतली, तीच भूमिका पवार साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल असे रोहित पाटील म्हणाले. साहेबांच्या विचारांची खूनगाठ आपण सर्वजण बांधूया आणि राज्यात पुन्हा आपली सत्ता आणू अशी शपथ घेऊयात असेही रोहित पाटील यावेळी म्हणाले.
राज्यात राजकीय वातावरण तापलं
गेल्या तीन दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना (Shivsena) फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान देत अजित पवार यांनी बंड केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा तिसरा भूकंप आहे असं बोललं जातं आहे. कारण 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे या दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दोन्ही गटाच्या बैठका
एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आले आहेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस; शरद पवार, अजित पवारांनी बोलावल्या स्वतंत्र बैठका, आमदारांना व्हीप जारी