Neelam Gorhe : कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव : निलम गोऱ्हे
Neelam Gorhe Majha katta: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे या एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला.
![Neelam Gorhe : कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव : निलम गोऱ्हे maharashtra politicis Majha katta Neelam Gorhe majha katta news shivsena Uddhav thackeray Neelam Gorhe : कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव : निलम गोऱ्हे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/12/3a34f23b399804e388fd7e0ed0296bbd1689146610277339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Neelam Gorhe Majha katta : मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र दिले होते. लोकांना त्यांनी भेटावं यासंदर्भात मी त्यांनी सांगितल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव साहेबांनी दिला नाही. ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे गोऱ्हे यावेळी म्हणाले. निलम गोऱ्हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेची दार बंद झाली
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं असे गोहरे म्हणाल्या. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले तर मी जाईल. मात्र आता त्याच्या गटात प्रवेश करणार नसल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
संजय राऊत यांनी मला खूप मदत केली
संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी मला मदत केल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. पण सद्याच्या राजकारणात राऊतांचा बळी केला असल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. संजय राऊत यांनी टोकाचं बोलू नये. वैचारिक मांडणी करावी असे गोऱ्हे म्हणाल्या.
रश्मी वहिनी राजकारणात आल्या तर माझ्या शुभेच्छा
रश्मी वहिनी या गृहिणी आहेत. त्यांची भूमिका उद्धव ठाकरेंना पूरक असते. उत्साही आणि क्रियाशील आहेत. त्या राजकारणात आल्या तर येऊ शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)