Chitra Wagh : मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या कमी, चित्रा वाघ यांचे आरोप
Chitra Wagh News : 2014 ते 19 दरम्यान फडणवीस सरकार सत्तेत असतानाही मनोधैर्य योजनेचा निधी आणि लाभ मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसून येते.
Chitra Wagh : बलात्कार पीडित महिला तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शासन पातळीवर निधी मिळत नव्हते
एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणाऱ्या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचे दिसून येते. वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती. ती वर्ष 2019-20 पर्यंत 462 पर्यंत खाली आली आहे. असं सांगत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
फडणवीस सरकार सत्तेत असतानाही निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या कमीच
पोलिसांकडून मनोधैर्य योजनेसाठी निधी देण्यासंदर्भातले प्रस्ताव गेल्यानंतरही शासन पातळीवर निधी मिळत नव्हते असे त्यांचे आरोप आहे. दरम्यान चित्रा वाघ असा आरोप करत असल्या तरी 2014 ते 19 दरम्यान फडणवीस सरकार सत्तेत असतानाही मनोधैर्य योजनेचा निधी आणि लाभ मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसून येते.
मनोधैर्य योजनेत लाभ मिळवणाऱ्या पीडित महिला
वर्ष. लाभ मिळणाऱ्या पीडित महिला
2014-15 2502
2015-16 2588
2016-17 1707
2017-18 1302
2018-19 1140
2019-20 462
2020-21 650
महत्वाच्या इतर बातम्या
Shivsena: निष्ठेचं फळ! अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून वर्णी