Navneet Rana : नवनीत राणांची तक्रार, मुंबई, अमरावती पोलीस आयुक्तांना लोकसभा सचिवालयाची नोटीस
अमरावती (Amravati) पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि मुंबई (Mumbai) पोलीस आयुक्तांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलीय.
Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीवरून अमरावती (Amravati) पोलीस आयुक्त, मुंबई (Mumbai) पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त अमरावती यांना लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. काय म्हटलंय
नवनीत राणांची मुंबई, अमरावती पोलीस आयुक्तांना नोटीस
15 नोव्हेंबर 2020 रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस वाहनात खासदाराला बसवून नेल्याने आणि मुंबईला जात असतांना जबरदस्तीने थांबविणे, सोबतच पोलीसांनी अपशब्द वापरल्याचं खासदार नवनीत राणा यांनी अशी तक्रार केली होती. यावर खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, 15 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी आम्ही मुंबईसाठी निघत होतो, तेव्हा पोलीसांनी एका क्रिमिनल आरोपींसारखं पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले आणि तिथं अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले. आम्ही शांततेत मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांना निवेदन देणार होतो. पण पोलिसांनी आम्हाला चार तास पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात बसून ठेवलं. याचीच तक्रार मी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आणि त्या तक्रारींवर लोकसभा सचिवालय यांनी 9 मार्चला हजर राहण्याची नोटीस दिली आहे. नवनीत राणा स्वतः यावेळी तिथं हजर राहणार आणि या अधिकाऱ्यांना निलंबित केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
प्रकरण काय आहे?
2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली. 14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते. पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते.
निलंबनाची कारवाई करायला लावणार
यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nana Patole : ज्यांना मुलं बाळं नाहीत, अशांना त्यांच्या वेदना काय कळणार, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना टोला
- माढ्याच्या खासदारांवर त्यांच्याच कट्टर कार्यकर्त्याकडून फसवणुकीचे आरोप; नाईक निंबाळकरांचं स्पष्टीकरण
- IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका मुंबईला बसणार, पाहा काय सांगितलंय IPCC च्या अहवालात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha