Ashish Shelar : प्रवीण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई, शेलारांचा मविआ सरकारवर निशाणा
Ashish Shelar : केंद्रीय यंत्रणा भ्रष्टाचार विरोधात काम करतंय. मात्र राज्य सरकारकडून पोलीसांवर दबाव सुरू असल्याचा आरोप आशिष शेलारांनी (Ashish Shelar) केला आहे
BJP Ashish Shelar : केंद्रीय यंत्रणा भ्रष्टाचार विरोधात काम करतंय मात्र राज्य सरकारकडून पोलीसांवर दबाव सुरू असून मविआ सरकार (Mahavikas aghadi) आडमुठेपणा करत असल्याचा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी केला आहे, पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपाने मिशन मुंबईचे रणशिंग फुंकले आहे. अशातच भाजप नेते आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aghadi) निशाणा साधलाय. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. मुंबई बँकेवर निवडून येताना प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणात मुंबईत दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
प्रवीण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई
महाविकास आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी राज्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणारच असे आव्हान शेलारांनी केलंय. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबई बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकरांवर सूडबुद्धीनं गुन्हा दाखल केला आहे असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे. शिक्षणसेवकांना न्याय दिला पाहिजे व त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. असंही शेलार म्हणाले. ऑक्सिजन प्लांटच्या कामातही जाणून बुजून दिरंगाई केली जातेय. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे शेलार म्हणाले.
बेस्टच्या ई-बसेसचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप
युरोपीयन युनीयनसह जगभरातल्या अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि पाकिस्तानी एजंटची गुंतवणूक असलेल्या कंपनीसोबत बेस्टच्या ई-बसेसचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. काल विधानसभेत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून पर्यावरण खात्यावर आणि मुंबई महापालिकेवर टीकास्त्र डागलं आहे. कॉसिस ई-मोबिलीटी या कंपनीकडून बेस्टसाठी 1400 बसेस घेतल्या जाणार आहेत. आणि त्याचा मोबदला म्हणून 2800 कोटी रुपये दिले जाणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. मात्र मुंबईच्या रस्त्यावर चाचणी न करताच या बसेसचं कंत्राट कसं दिलं, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. तसंच या कंपनीत मुख्य गुंतवणूकदार असलेल्या शौकत अली अब्दुल गफूर हा लिबियामधील पाकिस्तानी एजंट असल्याचाही आरोप शेलारांनी केला आहे. इंडियन स्टेट फॉरेस्ट तर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात जंगल वाढले, असं जाहीर करण्यात आलं असलं तरी 1 हजार 882 चौ. किमीचे जंगल गायब झाल्याचंही नमूद करण्यात आलं हे जंगल 1 हजार कोटींचं असल्याचा दावाही शेलारांनी केला आहे.
संबंधित बातम्या