Ajit Pawar: तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही,असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला.
Ajit Pawar: गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहे. आता 80 वर्षाचे झाले. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. आता तुमचे वय झाले आहेत. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये भाजपसोबत पाच बैठका झाल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.
मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले
अनेकदा मी माघार घेतली. मी टीका सहन केली. अनेकदा मी अपमान सहन केले. पण मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं तर का तिथे आम्हाला पाठवलं. 2017 लाही असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले, आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की बाहेर काहीच बोलायचं नाही, असे अजित पवार म्हणाले.
मला पण मोठ्या पदाची अपेक्षा : अजित पवार
महाराष्ट्र देशभरात सर्वच पातळीत पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे . मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी कामी आहोत का? असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित व्यक्त केली. मला चार वेळा उपमुख्यमंत्री केले आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले, मला पण मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.
नितिन गडकरींची इच्छा होती : अजित पवार
तुमच्या सर्वांच्या सहका-याने आपल्याला पुढे जायचं आहे. मला मानापासून वाटत होतं की, आपला पक्ष वाढला पाहिजे भाजपने 2014 ला सांगितलं होतं की, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने 16-16-16 जाग्या लढवाव्या ही नितिन गडकरींची इच्छा होती मात्र तस होऊ शकलं नाही.