Sanjay Raut : 'मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत', संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut On Farmer Protest : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीशांनीही अशी दमनशाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरूद्ध करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले
Sanjay Raut On Farmer Protest : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनलाच्या (Farmer Protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकार तसेच भाजपवर (BJP) निशाणा साधलाय. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीशांनीही अशी दमनशाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरूद्ध करत आहेत. स्वातंत्र्यकाळात सुद्धा आंदोलने झाली, लाला लजपतराय ज्यांचे नेते होते, ब्रिटीशांनी केलेल्या लाठीमारात लालालजपतरायांचं निधन झालं, मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं, आता सुद्धा मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
राजधानी काय उद्योगपतींच्या नावावर केली का? राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ज्या राजधानीत शेतकरी येऊ शकत नाही, ती देशाची राजधानी काय उद्योगपतींच्या नावावर केली का? असा सवालही राऊतांनी यावेळी केला आहे. तर ही एक प्रकारची दडपशाही म्हणजेच गुंडशाही सुरू आहे.
महाराष्ट्रात पिकविमा योजनेचा बोजवारा
राऊत पुढे म्हणाले, तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता, ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला संदर्भात काही सूचना केल्या होत्या, त्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी होती. हेच मोदी सरकार 2014 पासून सांगतय, शेतकऱ्यांचा रोजगार दुप्पट केलं जाईल, सध्या सिंगल सुद्धा मिळत नाहीए, महाराष्ट्राची स्थिती पाहता पिकविमा योजनेचा बोजवारा उडाला आहे. सगळे राजकारणात अडकले आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना रोखले जात आहे.
लवकरच उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील
काल उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते, ते या विषयावर प्रश्न मांडले. लवकरच या संदर्भात ते पत्रकार परिषद घेतील. त्यात ते आपली भूमिका स्पष्ट करतील, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
'भाजपची भ्रष्ट काँग्रेस झालीय'
नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावर संजय राऊत यांनी देखील हल्लाबोल केला आहे. "सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली आहे", असे खासदार संजय राऊत म्हणाले.