एक्स्प्लोर

G-20 Summit: 'देश आणि राज्याप्रती 'त्यांचं' हे बेगडी प्रेम आहे', दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा टोला कुणाला?

Maharshtra Political News : 'निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं. मात्र राज्याचं तसेच देशाचं देशप्रेम यातून दिसलं', दिल्लीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय

G-20 Summit : जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली. सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा(J P Nadda), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. यावेळी दिल्लीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय असं म्हणाले, तर याच कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.  

'देशासाठी ही अभिमानाची बाब' - मुख्यमंत्री शिंदे
यावेळी दिल्लीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. हा फक्त केंद्राचा कार्यक्रम नव्हता. तर  महाराष्ट्रात 4 समिट बैठका होत आहेत. या बैठकीत सादरीकरण झालंय. असं मुख्यमंत्री म्हणाले. 

'हे बेगडी प्रेम आहे..' एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे, ते म्हणाले, निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं. मात्र राज्याचं तसेच देशाचं देशप्रेम यातून दिसलं. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय? हे बेगडी प्रेम आहे, मी मुख्यमंत्री झालो तर काही लोक घराबाहेर आले. आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले.


'हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय'
मुख्यमंत्री म्हणाले, बेळगांव सीमा बांधवांबद्दल बोलत आहेत, त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेल मध्ये राहिलाय. विकासाच्या गप्पा मारणा-यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते आज कार्यक्रमाला आले नाही. अजित दादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही, आम्ही कामानं उत्तर देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.


मोदींकडून सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन
जी-20 परिषदेच्या तयारी संदर्भातील बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय पक्षांना भारताच्या जी-20 अध्यक्षपदासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "कोणताही पक्ष किंवा व्यक्तीसाठी नव्हे तर भारतासाठी मिळालेला हा सन्मान आहे. हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्याने काम केले पाहिजे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, भारताचे जी 20 अध्यक्षपद संपूर्ण देशासाठी आहे, जगाला आपली ताकद दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

G-20 Summit: सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाले मुख्यमंत्री शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी; पंतप्रधान म्हणाले, प्रत्येकाचं योगदान आवश्यक

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget