एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : "आम्ही भाजपासोबत फॉर्म्युलावर चालत नाही, तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो" दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Deepak Kesarkar : दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे यांच्या बद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे.

Deepak Kesarkar : आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनाही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. यावर "आम्ही भाजपासोबत फॉर्म्युलावर चालत नाही तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो" अशा प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलीय. आम्हाला 48 पैकी 45 सीट जिंकायचे आहे. निष्क्रिय सरकार आणि काम करणारे सरकार हे लोकांना लवकरच कळेल, जे लोक बिल्डरला विकले गेले असेल, त्यांनी विकले जावे. आम्ही बिल्डरला विकले गेलेले लोक नाहीत असा टोला केसरकरांनी विरोधकांना लगावलाय. 

 

जरांगेंनी कायदे तज्ज्ञांकडून काही गोष्टी समजून घ्याव्या - केसरकर

दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या बद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे. मराठवाड्यात कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्ही जे नोटिफिकेशन काढले ते कायम करायचं ही त्यांची मागणी आहे. आलेल्या हरकतींवर विचार करून अध्यादेश काढावा लागतो. ही जर कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहीत नसेल, तर आमचं नोटिफिकेशन रद्द होईल. कायदे तज्ज्ञांकडून या गोष्टी समजून घ्याव्या


मंत्र्यांच्या बंगले खर्चावर केसरकर म्हणाले...

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचे नूतनीकरण करून घेतले होते. मात्र, मागील पाच महिन्यांत नूतनीकरणावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे, यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, महाराष्ट्र वैभवशाली राज्य आहे. लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. महाविकास आघाडीच्या काळात किती मंत्रांच्या घरावर खर्च झाला याचा सुद्धा तपशील मी तुम्हाला देईल. बंगल्यावर खर्च करणे ही तो सुद्धा मेंटेनन्स साठी ही एक कंटिन्यूअस प्रोसेस असते आणि हे काम पीडब्ल्यूडी करतं असं ते म्हणाले. 

 

"काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गमावले" 

उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर असून 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे मनोज जरांगे यांचे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे. यावर केसरकर म्हणाले, कोणालाही न भेटता पॅलेस पॉलिटिक्स करायचं यात सगळं त्यांनी गमावलं आहे. काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार गमावले आहेत. भाजप सेनेतील मैत्री बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. अजित पवार आल्यामुळे याला अधिक मजबूती प्राप्त झाली आहे असं केसरकर यावेळी म्हणालेत.

 

विनायक राऊतांनी मंत्रिपदासाठी माझ्याकडे पैसे मागितले - केसरकर

केसरकर पुढे म्हणाले, विनायक राऊत यांनी मला सांगितलं की, आमच्याकडे एक जागृत देवस्थान आहे, तिथे येऊन सांगा की, तुम्हाला मंत्री पदासाठी पैसे मागितले. मी त्यांना सांगतो, आज मी त्या जागृत देवस्थानाला जाणार आहे. सगळ्यांसमोर मी सांगेल की तुम्ही पैसे मागितले होते. जो मनुष्य सच्चा असतो तो कशाला घाबरत नाही आणि पैसे दिले नाही, म्हणून तुम्ही मला मंत्रिपद दिलं नाही, त्याची मला काळजी नाही. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, उद्या येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल.तेव्हा मी स्वतः सांगितलं होतं, मी कोकणी म्हणून शाळेत स्वाभिमानी आहे. तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही. खोके बोलणारे स्वतः खोके मागत असतात उद्धव ठाकरे माणुसकी विसरतात म्हणून लोक त्यांच्यापासून लांब जातात.

 

हेही वाचा>>>

Deepak Kesarkar : शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर, दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg News: दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Embed widget