Asaduddin Owaisi : राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा, कुठे कुठे होणार सभा? खासदार ओवेसींची माहिती
Asaduddin Owaisi : ओवेसी म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी व आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री काय दुधाने धुतलेले नाहीत, ते पण मुस्लिम द्वेष्टेच आहेत-
![Asaduddin Owaisi : राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा, कुठे कुठे होणार सभा? खासदार ओवेसींची माहिती Maharashtra Political marathi news Asaduddin Owaisi information about Meetings will be held all over Maharashtra like Raj Thackeray Asaduddin Owaisi : राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा, कुठे कुठे होणार सभा? खासदार ओवेसींची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/cff245221f4dfc39e2f6ba43c83d79f7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष भाजपाने सुरु केला आहे, सर्वात जास्त हिंदुत्वाच्या मुद्यावर कोण चालतंय जे आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जात आहे. राजकीय स्पर्धा होत आहे. काल नांदेड येथे एमआएम तर्फे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा
महाराष्ट्रात चालत आसलेल्या भोंग्याविषयी राज ठाकरे जे बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच ओवेसी म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघा भावांचे भांडण आहे, त्याबद्दल भावना मुख्यमंत्री यांना विचारा, मी द्वेषाचे राजकारण करत नसतो, पण ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे निश्चितच आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, परळी यासह महाराष्ट्रभर सभा घेऊ. त्याच प्रमाणे देशात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी,समाजवादी पार्टी, हे स्वतःला हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ज्यामध्ये स्वतः काँग्रेस व आप हे पक्ष काय दुधाने धुतलेले नाहीत. ज्या प्रमाणे देशात समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच पद्धतीने देशात दारू बंदी ही व्हायला हवी, सगळ्यांचे उत्पन्न बरोबर असायला हवं, याही गोष्टी होणे गरजेचं असल्याचे खासदार ओवेसी म्हणाले.
..त्यामुळे आमच्यावर राग काढत आहेत
भोंग्यांचा मुद्दा म्हणजे मुस्लिम विरोधात षडयंत्र तयार केले जात असलेल्या वातावरणाचा एक भाग आहे. आम्ही कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या भूमिकेत आहोत. आम्ही निवडणूक लढवून शिवसेनेचा पराभव केला याचं दुःख संजय राऊत यांना आहे. त्यामुळे आम्हाला बी टीम म्हणून आमच्यावर राग काढत आहेत.
यावर ओवेसींनी बोलणं टाळलं
काल राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्यां विषयी व एकदाच होऊन जाऊद्या या वक्तव्यावर बोलणे मात्र ओवेसींनी टाळलय.
लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा
मशिदीवरचे भोंगे उतरत नसतील तर अजिबात शांत बसू नका! असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलंय. औरंगाबादेत आज राज ठाकरेंची सभा झाली. सभेला राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.. मशिदीवरील भोंग्यांना अल्टिमेटमची आठवण करुन देताना राज ठाकरेंनी एकदा होऊनच जाऊ द्या असं म्हंटलंय.
संबंधित बातम्या
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, इम्तियाज जलील यांचं आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)