एक्स्प्लोर

Girish Mahajan : "मुंबई महापालिका 'त्या' बापलेकांसाठी सोन्याची कोंबडी! गिरीश महाजनांचा हल्लाबोल कोणावर? विविध मुद्द्यावर विरोधरांना प्रत्युत्तर

Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणतात, बापलेकांची परिस्थिती एवढी केविलवाणी झालीय की, त्याबद्दल न बोललेलं बरं.. आणखी काय म्हणाले महाजन? जाणून घ्या

Girish Mahajan : "तुमचा जीव मुंबईत अडकलेला आहे..तो पोपटासारखा आहे. मुंबई महापालिका (Mumbai Muncipal Corporation) म्हणजे त्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी आहे" भाजपचे गिरीश महाजन यांनी ठाकरे पिता-पुत्रावर जळगावात हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुक, मुंबई महापालिका, कोस्टल रोड या संदर्भात राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिलंय. आणखी काय म्हणाले गिरीश महाजन? 

''तुमच्या पोटात का गोळा उठतोय?'' - गिरीश महाजन

गिरीश महाजन पुढे म्हणतात, बापलेकांची परिस्थिती एवढी केविलवाणी झालीय की, त्याबद्दल न बोललेलं बरं..आम्ही केलेल्या कामांना तुम्ही नाव दिले, आम्ही केलेल्या कामांचा तुम्ही उद्घाटन केलं आम्ही काही बोललो का..? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात गतिमान सरकार सुरू आहे..तुमच्या का पोटात गोळा उठतो आहे.

"बापलेकाचा जीव मुंबईत अडकलेला"

तुमचा जीव मुंबईत अडकलेला आहे..तो पोपटासारखा आहे.. मुंबई महापालिका म्हणजे त्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी आहे. तिथे काही झालं कशाचाही उद्घाटन झालं तरी त्यांचा जीव गुदमरतो..म्हणून बिचारे हे बोलतात. असं महाजन यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंना जोरदार शब्दात प्रत्युत्तर

'निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार घडतोय; असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी भाजपवर केला. याचा मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे. ते म्हणाले, थातूर मातूर लोकांना काय उत्तर द्यायची? कोंबडी चोरली आणि पंख चोरले.. इतके उद्विग्न झाले आहे उध्दव ठाकरे की, त्यांना समजत नाही काय करावं ते 

संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

मंत्री महाजन पुढे म्हणतात, बिचारे राऊत आणि त्यांना काही काम राहिलेले नाहीत. त्यांच्या मनाला कोणी आता काही किंमत देत नाही.. आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल, आता त्यांचं लहान मुलांच्या नळावरच्या भांडणासारखा चालला आहे..कोंबडी, पंख, पिसे , तंगडी, लेक पिस अस असं चाललंय त्यांचं..कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढली. डबल गद्दार म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर आणि केसरकरांना टोला लगावला आहे, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे

रामदास आठवले यांची भुजबळांना ऑफर, गिरीश महाजन म्हणाले...

रामदास आठवले यांनी भुजबळांना ऑफर दिली आहे, यावर महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, रामदास आठवले यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी कोणाला घ्यायचा आणि कुणाला घ्यायचं नाही हा त्यांचा निर्णय आहे. ते उद्या कोणालाही सांगू शकतील आमच्या पक्षात यास काय अडचण आहे..आणि रामदासजी हे आमच्याच आघाडीमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी कुणालाही घेतलं तर आम्हाला काही अडचण नाही. रामदास आठवले यांनी भुजबळांना ऑफर, छगन भुजबळ भाजपपेक्षा आरपीआयमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटल आहे, त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलंय.

हे ही वाचा>>

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Embed widget