एक्स्प्लोर

Marathwada NCP MLA: मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोणते आमदार अजित पवारांसोबत जाणार?

Marathwada NCP MLA: मराठवाड्यात एकूण 11 राष्ट्रवादीचे आमदार असून, ज्यात विधानसभेवर निवडणून आलेले 8 आणि विधानपरिषदेचे 3 आमदार आहेत.

Marathwada NCP MLA: एक वर्षांपूर्वी जे शिवसेनेत घडलं तेच आता राष्ट्रवादीमध्ये घडतांना पाहायला मिळत आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून गेले आणि आज अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवारांची साथ सोडून गेले आहेत. तर अजित पवारांसोबत (Ajit Pawar) मराठवाड्यातील (Marathwada) देखील काही आमदार गेल्याची चर्चा असून, त्यातील बीडचे धनंजय मुंडे आणि लातूरचे संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोणते आमदार अजित पवारांसोबत जाणार? याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

अजित पवार यांनी आठ आमदारांसह रविवारी सरकारमध्ये एन्ट्री केली आहे. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेमके आमदार किती आहेत? हे अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'नं नेमकं कोण कोणासोबत आहे? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यात मराठवाड्याचं विचार केला तर मराठवाड्यात राष्ट्रवादीचे विधानसभेवर निवडणून आलेले एकूण 8 आमदार आहेत. तर विधानपरिषदेवर 3 आमदार असून, एकूण 11 राष्ट्रवादीचे आमदार मराठवाड्यात आहेत. 

मराठवाड्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या एकूण 11 आमदारांपैकी काही जणांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर यातील चारजण अजित पवारांसोबत आहेत. तर दोघांनी शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहेत. ज्यात संदीप क्षीरसागर आणि राजेश टोपे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मराठवाड्यातील एकूण परिस्थिती काय?

बीड : मराठवाड्यात सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार बीड जिल्ह्यात आहेत. तर बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके अजित पवारांसोबत आहेत. पाटोद्याचे आमदार बाळासाहेब अजबे यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. 

लातूर : जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. ज्यातील एक संजय बनसोडे यांनी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे देखील अजित पवारांच्या सोबत आहेत. 

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघ देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, येथे राजेश नवघरे हे आमदार आहेत. त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र ते शरद पवारांच्या सोबत असल्याचे बोलले जात आहे. 

परभणी : जिल्ह्यातील बाबाजी दुर्राणी विधान परिषदेचे आमदार असून ते शरद पवारांच्या सोबत आहेत. 

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील विधान परिषदेचे दोन आमदार असून, ज्यात विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांचा समावेश आहे. तर विक्रम काळे हे कालच मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित होते. तर सतीश चव्हाण देखील अजित पवारांचे खास समजले जात्तात आणि ते कालच मुंबईला रवाना झाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shriniwas Patil : ज्यांच्यासाठी शरद पवारांची भर पावसात सभा, ते श्रीनिवास पाटील कुणासोबत?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget