एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : आम्ही पू्र्ण तयारीने आलोय, 11 जुलैपर्यंत इथे राहावं लागलं तरी राहू : भरत गोगावले

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत पाठिंबा काढल्याबाबतचं पत्र राज्यपालांना द्यायचं की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.

Maharashtra Political Crisis : राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती ओढावलेली असताना एकनाथ शिंदे गटातील आमदारांची आज दुपारी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचं राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एबीपीशी बोलताना दिली.

ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही : भरत गोगावले
भरत गोगावले म्हणाले की, "आम्ही पूर्ण तयारीनिशी इथे आलो आहोत. जर 11 जुलैपर्यंत इथे राहावं लागलं तर चालेल, आम्ही तयार आहोत. ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नियमांनुसार जी प्रक्रिया होणं गरजेचं आहे, ती केली जात आहे. आम्ही काळजीपूर्वक पाऊल उचलत आहोत, कारण छोटीसी तरी चूर झाली तर काहीही फायदा होणार नाही. आजच्या बैठकीत राज्यपालांना पाठिंबा काढल्याबाबत पत्र द्यायचं की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमच्या गटातून कोणीही बंडखोरी करणार नाही. उद्धव ठाकरे गटाला जे करायचंय ते करावं, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार आहोत."

सुप्रीम कोर्टातील याचिकेत बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा
दरम्यान सुप्रीम कोर्टात काल (27 जून) झालेल्या सुनावणीआधीच मोठी बातमी समोर आली होती. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरु केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा 38 आमदारांनी पाठिंबा काढला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे. त्यानंतरही विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरु केल्याचं बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटलं होतं.

बंडखोर आमदारांना दिलासा, झिरवाळांना नोटीस
या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांना मोठा दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार बंडखोर आमदारांवर 11 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीसला 12 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाप्रकरणी निर्देश देताना सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Embed widget