एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : राज्यात राजकीय संकट: राष्ट्रवादीचं काय ठरलं? जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं

Maharashtra Political Crisis Jayant Patil : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले.

Maharashtra Political Crisis Jayant Patil : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक 'सिल्वर ओक'मध्ये पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील दिशा ठरवण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकार टिकावं अशी आमची इच्छा असल्याचेही पाटील यांनी म्हटले. राज्यातील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आज सायंकाळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकांव अशी आमची इच्छा आहे. सरकार टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याबाहेर गेलेले शिवसेना आमदार माघारी येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असल्याने त्यांना आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या असलेला प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद सोडले नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. सरकारी कामकाज करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी ते वर्षा बंगल्यावर आले होते. त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्वांनी विनंती केल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर वास्तव्यास आले होते, असेही पाटील यांनी सांगितले. 

मुंबईतील शिवसेना आमदारांवर विश्वास होता

आज एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे आणखी चार आमदार सामील झाले. यामध्ये सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. शिवसेनेचे किमान मुंबईतील आमदार बाहेर जाणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या गुवाहाटीत दाखल झालेले आमदार शिंदे गटासोबत संवाद साधत असावेत, तिकडे नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी गेले असावेत. नेमकं ठोस सांगता येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. 

आमदार माघारी येतील

शिवसेनेतील हा वाद निवळेल असा विश्वास व्यक्त करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहतील आणि त्यांचे आमदार झुगारणार नाहीत, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती  पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंदCM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेतABP Majha Headlines : 04 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Chhagan Bhujbal : 'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
Suhas Palshikar on Majha Katta: भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
Sangli News : सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
Embed widget