अजित पवारांच्या निर्णयावर महाविकास आघाडीची पहिली प्रतिक्रिया; अंबादास दानवे म्हणाले...
DCM Ajit Pawar : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दुपारपर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी अचानक शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. दरम्यान, यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.
अजित पवारांच्या निर्णयावर मविआची पहिली प्रतिक्रिया
दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "जे निधी देत नाहीत म्हणून ओरड होत होती, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार. आता कोणाला दोष देणार?, मला कीव येते, त्या 40 जणांच्या गँगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी!.. तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची भीती मिंधे गटापेक्षा भाजपलाच अधिक वाटते आहे. निकालाचा उलटफेर झाला तर सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप आहे.' अशी टीका दानवे यांनी ट्विट करत केली आहे.
अंबादास दानवे यांची टीका
घ्या!
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 2, 2023
जे निधी देत नाहीत म्हणून ओरड होत होती, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार! आता कोणाला दोष देणार?
मला कीव येते त्या ४० जणांच्या गॅंगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..!
उद्धव ठाकरे आणि…