(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडात 35 आमदार; 'वर्षा' वर कोणते आमदार दाखल झाले, पाहा यादी
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षांसह 35 आमदार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडाळी केल्याने उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी वर्षा बंगल्यावर तातडीने शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत शिवसेनेचे विधानसभेतील 14 आमदार दाखल झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या नावांची यादी वाढत आहे. त्याशिवाय काही आमदारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे तूर्तास चित्र स्पष्ट झाले नाही.
या बैठकीत कोण पोहचले ?
1) वैभव नाईक
2) दिवाकर रावते
3) उदयसिंग राजपूत
4) विनायक राऊत
5) नरेंद्र दराडे
6) अनिल देसाई
7) विकास पोतनीस
8) विनायक राऊत
9) सुभाष देसाई
10) वरूण सरदेसाई
11) अरविंद सावंत
12) किशोर दराडे
13) किशोर साळवी
14) आमशा पाडवी
15) चंद्रकांत रघुवंशी
16) रवींद्र वायकर
17) गुलाबराव पाटील
18) संजय राऊत
19) नीलम ताई गोरे
20) दादा भुसे
21) सचिन अहिर
22) सुनील शिंदे
23) संजय राठोड
24) सचिन पडवळ
25) अंबादास दानवे
26) मंगेश कुडाळकर
27) प्रकाश फातर्पेकर
28) राहुल शेवाळे
29) राहुल पाटील
30) सुनील प्रभू
31) दिलीप लांडे
32) उदय सामंत
33) राजन साळवी