एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis: सत्ता येते, सत्ता जाते... जितेंद्र आव्हाडांचा भावनिक मसेज 

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. सरकार कोसळल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भावनिक पोस्ट केली आहे. सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत. 

काय म्हटले आव्हाडांनी?
माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा आदरणीय  शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करीत असतांना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव श्री. संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्री. श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव श्री. मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव श्री. डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी श्री. म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी श्री. सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी श्री. डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी ह्या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.

मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो.

परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिका-यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणा-या प्रत्येकाची नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले.

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहका-याबद्दल आपले आभार मानतो.

आणि हो आणि कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे 
 आपला 
-डॉ. जितेंद्र आव्हाड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
Sanjay Rathod : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
Maharashtra Live Blog Updates :सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Maharashtra Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Nashik Crime News: शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?
शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Tukaram Mundhe : धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
Embed widget