Maharashtra Political Crisis Timeline : राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं?
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस आहे. आतापर्यंत काय काय घडलं ते एका क्लिकवर जाणून घ्या...
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले.
22 जून 2022
एकनाथ शिंदेंचं बंड तीव्र...
शिंदेंसोबतचे सर्व आमदार सुरतमधून गुवाहाटीला निघण्याच्या तयारीत...
कार आणि बसमधून शिंदे समर्थक आमदार विमानतळाकडे रवाना...
शिवसेना आमदारांनी कोणतही बंड केलेलं नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
गुवाहाटीला रवाना होण्यासाठी शिंदेंसह समर्थक आमदार सुरत विमानतळावर दाखल
शिदेंसोबत शिवसेनेचे ३३ तर इतर दोन आमदार
एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल
विमानतळावरुन सर्व आमदार गुवाहाटीच्या ब्ल्यू रेडिसन हॉटेलमध्ये
शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडू शिंदेंसोबत गुवाहाटीत
गुवाहाटीमध्ये पोहचताच एकनाथ शिंदे पुन्हा कॅमेऱ्यासमोर
आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदेंचं शिवसेनेला आव्हान
एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंचं वक्तव्य, बच्चू कडू शिंदेंसह गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती
ठाण्यातले 5 आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सोबत ठाण्यात आणखीन काही नगरसेवक स्टँड बाय मोड वर असल्याचीही माहिती
देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक... शरद पवार सिल्व्हर ओकवरील बैठक आटोपून वाय. बी. चव्हाण सेंटरला
महाराष्ट्रातील राजकीय पेचावर खासदार संजय राऊतांचं ट्विट, 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा, बरखास्तीच्या दिशेनं', असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे एकप्रकारे राऊतांकडून संकेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या कार्यालयात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह... मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थिती
दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य, शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहायला हवं असं केसरकर म्हणाले.
"मला उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं" शिवसेनेतील बंडावर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य
दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नारायण राणे दाखल
शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले शिदेंकडून सुनील प्रभूंची प्रतोद पदावरुन उचलबांगडी
राज्यात राजकीय घडामोडींना वेग अपक्ष आमदार गीता जैन आणि बविआचे क्षितीज ठाकूर फडणवीसांच्या भेटीला तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे... उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. "मी राजीनामा तयार करुन ठेवलाय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा" उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना समोर येण्याचं आव्हान
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्विट, "होय, संघर्ष करणार" राऊतांचा ट्विटमधून विरोधकांना टोला
गुवाहाटीला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला मारहाण झाल्याचं आणि जबरदस्ती नेल्याचं सांगत हे सगळं भाजपचं षडयंत्र असल्याचा दावा केला.
23 जून 2022
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र
शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली, मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरु झालं
कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल झालं
राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं
गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन केलं
आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत राऊतांनी सांगितलं. शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा केला
'ही आहे आमदारांची भावना'; एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट केलं. हे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं ज्यात बडव्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रार होती
पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं
एक दिवस आधी एकनाथ शिंदेंविरुद्ध आंदोलन करणारे सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार शिंदे गटात गेले, यानंतर सदा सरवणकर गद्दार म्हणत शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं
गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर आला
कृषीमंत्री दादा भुसेही एकनाथ शिंदे गटात जाऊन पोहोचले
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले
शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही"
सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो जारी करत दिला पुरावा
नाना पटोले म्हणाले...अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे, निधी देत नसत
एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही?, शरद पवार गृहखात्यावर नाराज
का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण
आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला
बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!
भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, तर शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही, बंडखोरांना इकडे यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले
एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी नार्वेकरांसोबत सूरतला गेलेले फाटकही शिंदेंच्या गटात, गुवाहाटीत दाखल
बंडखोरांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल; नारायण राणेंची थेट शरद पवारांना धमकी
12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी केली तर आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, खरी शिवसेना आमचीच; कारवाईसंबंधी शिवसेनेच्या पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा इशारा
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश
24 जून 2022
बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली
एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील
अजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं
शिवसेनेकडून शिंदे गटातील आणखी चार आमदारांच्या अपात्रतेची मागणी; एकूण 16 आमदार लिस्टमध्ये...
आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा; उद्धव ठाकरे यांचं आवाहन, उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान... हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार
नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा; अपक्ष आमदारांचे पत्र
शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक, दोन तासांनी संपली बैठक
बंड करण्यासाठी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, आता आपण लढायचं आणि जिंकायचं, आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
तुम्ही निवडून आलेल्यांना फोडून दाखवाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपला आव्हान