एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप

CM Uddhav Thackrey : राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते.

CM Uddhav Thackrey : राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन केले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. बुधवारी सकाळी राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. हाच धागा पकडून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह  यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचा भंग करत लोकांची भेट घेतली अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजिंदर पाल सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. 

तक्रारीत काय म्हटलेय?
तेजिंदर पाल सिंह यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमाचं उल्लंघन केलेय आहे. बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त झळकले होते. याला काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दुजोरा दिला होता. कोरोना नियमांनुसार, कोरोना रुग्णाला कुणालाही भेटता येत नाही. विलगीरणात राहावे लागते. पण मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियम मोडले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करतो. 

मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण?
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त सकाळी आले होते.  मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्विक अँटिजन टेस्ट करण्यात आली. याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, पण आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संभ्रम आहे. त्यामुळे काही काळानं पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत की, नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल. 

शरद पवारांनाही भेटले मुख्यमंत्री-
राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरु होती, पण त्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही. यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान, मातोश्रीवर शिवसैनिक जमा होत होत असून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget