एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis :  शिवसेना-बंडखोरांमधील 'अंतर वाढलं' एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचे गुवाहाटीला एअरलिफ्ट  

Eknath shinde : सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांचे आता सुरतवरुन एअरलिफ्ट करण्यात येत असून त्यांना आता गुवाहाटीला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात आहेत. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारला आहे. हे आमदार पहाटे सुरतमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 

शिवसेनेने महाविकास आघाडीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चाही झाल्याची माहिती आहे.

आता या सर्व आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येत असून रात्री एक वाजेपर्यंत ते गुवाहाटीला पोहोचणार आहेत. 

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे फोनवरुन चर्चा

मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  त्यांनी यावेळी उद्धव  ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला? 

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी  कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP MajhaChandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका
'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका
Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Embed widget