Parshuram Ghat : चिपळूणजवळचा परशुराम घाट 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान वाहतुकीसाठी बंद
Chiplun Parashuram Ghat : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाटातील 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे.
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट येत्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दुपारी 11 ते संध्याकाळी 5 कालावधीत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालणार आहे. नेमक्या कोणत्या वेळात वाहतूक बंद ठेवायची याचा निर्णय आगामी दोन दिवसात घेतला जाणार आहे.
मुंबई गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग. काही वर्षांपूर्वी याच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. या कामाला गती देऊन पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भींत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन घातलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या कार्यवहीनंतर परशुराम घाट रुंदीकरणाचे काम 25 एप्रिलपासून ते 25 मेपर्यंत घाटात दुपारी 11 ते संध्याकाळी 5 वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
डोंगरदऱ्यातून तयार केलेला मार्ग असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे परशुराम घाटाचे पावसाळ्यापुर्वी काम जलद गतीने पुर्ण होण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे.
परशुराम घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे. या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात होती. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :