(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चाकूचा धाक दाखवून नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल पळवला, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Mumbai News : चाकूचा धाक दाखवून नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल पळवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Mumbai police : नौदल अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांचा मोबाइल फोन हिसकावून घेतल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतल्यानंतर हे दोघे हाती लागले. वसीम शेख उर्फ तिरची टोपी ( वय, 32 ) आणि अमीन खान उर्फ टायगर ( 25 ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. सुमित संजय कुमार ( 24) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित कुमार हे लॉग एक खलाशी आणि आयएनएस चेन्नई डिस्ट्रॉयर जहाजातील नौदलाचे अधिकारी आहेत. 17 एप्रिल रोजी ते कर्नाक बंदरहून मुसाफिर खानाकडे जात असताना दोन जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल पळवून नेला. यावेळी कुमार यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली झाली आहे.
या प्रकरणी कुमार यांनी तक्रार दिल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 394 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एपीआय नीलेश साळुंके, पीएसआय दिनेश पाटील आणि स्वप्नील शिंदे यांच्या पथकाने टोपी आणि टायगर या दोघांना अकट केली.
अटक केलेले दोघेही व्यसनी असल्याचा संशय असून त्यांनी व्यसनासाठीच हा गुन्हा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकणी अद्याप संशयितांकडील फोन जप्त केला नाही. फोन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या दोघांकडेही कसून चौकशी करत आहेत. या दोघांनी या पूर्वी अजून कोठे असे गुन्हे केले आहेत का? शिवाय त्यांच्या टोळीत हे दोघे जणच आहेत की, अजून कोणाचा समावेश आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनाच नियमांबाबत जनजागृती करण्याची शिक्षा, कल्याण पोलिसांचा उपक्रम
- Navneet Rana vs Shivsena : हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्या मातोश्रीवर जाणारच; आमदार रवी राणा यांचा निर्धार
- बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ देत, हा फिल्मवाल्यांचा स्टंट ; संजय राऊतांचं राणा दाम्पत्यावर टीकास्त्र