Maharashtra Omicron Cases: राज्यात ओमायक्रॉनच्या 113 रुग्णांची नोंद, 48 रुग्ण नागपुरातील
Maharashtra Omicron Cases: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1244 रुग्णांची नोंद ही पुणे महापालिका क्षेत्रात झाली आहे.
मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 113 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3334 रुग्णांची नोंद झाली आहे तर 1701 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 6898 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6739 अहवाल प्राप्त झाले आहेत. 159 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यात आज नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 42 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबई आणि ठाणे मनपा क्षेत्रात प्रत्येकी 18 रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबईमध्ये 13, पुणे शहरात 6 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1080 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 18 रुग्ण सापडले आहेत. तर पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1244 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 18 हजार 067 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 33 हजार 633 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.87 टक्के आहे. सध्या राज्यात 9 लाख 73 हजार 417 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 49 लाख 51 हजार 750 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 18, 067 नव्या रुग्णांची नोंद, तर 79 रुग्णांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एक हजारांहून अधिक, बुधवारी 1 हजार 128 नवे कोरोनाबाधित
- Omicron Variant : ओमायक्रॉनचा जगभरात कहर, गेल्या 10 आठवड्यांमध्ये 9 कोटींहून अधिक रुग्ण, WHOची माहिती