Nitin Gadkari : लवकरच वाहनांचा वेग वाढणार! 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार : नितीन गडकरी
Maharashtra News : महाराष्ट्राला लवकरच फाटकमुक्त करण्याचा निर्धार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
सांगली : महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगानं गाडी चालवण्यास लवकरच परवानगी देऊ, असं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगलीत सांगितलं. महाराष्ट्राला फाटकमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सांगलीत लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर आहेत. गडकरींच्या हस्ते आज दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतील कामांचं लोकार्पण झालं. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदार उपस्थित होते. गडकरी यांच्या माध्यमातून चांगले रस्ते झाले अशा शब्दांत जयंत पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं.
नितीन गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रचे Ambassador आहे. हवेतून चालणारी 80 लोक बसणारी बस सुरु करणार आहे. पुणे-शिरूर, वाघोली 1200 कोटीचा पूल उभारत आहे. जलसंवर्धन काम केले, रस्ते बांधताना एकही पैसा मागत नाही. सांगली-सोलापूर रस्त्यामध्ये नदी, नाले, खोलीकरण करुन दुष्काळी भागात शेततळे फुकट बांधून देणार आहे. सांगली जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क, सॅटेलाईट पूल उभारणार आहे. महाराष्ट्राला फाटकमुक्त करणार आहे.
अलीकडे माझे महाराष्ट्र मध्ये येणे कमी होते. पाण्याची महाराष्ट्रमध्ये मोठी समस्या आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागे पाणी आहे. आर. आर. पाटील मला नेहमी सांगायचे आटपाडी , सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात लक्ष द्या. बळीराजा योजना तयार करून पश्चिम महाराष्ट्र करता 6 हजार कोटी मंजूर केले होते, आज तो भाग पाणीदार झालाय याचा आनंद आहे. गणपतराव देशमुख यांनी सांगोलाला पाणी देण्यासाठी मागणी करत होते, ती मागणी पूर्ण केल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
Petrol-Diesel Price Hike: का वाढतायंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कारण...
राज्यात मंत्री असतो तर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल बांधलो असतो: नितीन गडकरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha