(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satellite : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आकाशातल्या गूढ दृश्यांनी थरकाप
चंद्रपूर जिल्ह्यात उपग्रहाचे अवशेष कोसळल्याची खगोलशास्त्रज्ञांना शंका आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात अवकाशातून एक रोषणाई जाताना दिसली. लोकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ही रोषणाई आगीच्या गोळ्यांप्रमाणे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली. चंद्रपूर, नागपूर, वाशिम, अकोला, जळगाव, जालना आणि बुलडाणा,अशा जिल्ह्यामध्ये ही खगोलीय घटना नागरिकांनी पाहिलं असल्याचं समोर आलंय.
आज जी अवकाशात खगोलीय घटना घडली यात उल्कापात की सॅटेलाईट उपग्रहाचे अंतराळातील तुकडे आहे हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, एखादा कृत्रिम सॅटेलाइट पडण्याआधी तशी सूचना त्या देशाला मिळतात मात्र आज घटनेच्या बाबत अशी कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा सॅटेलाईट आहे की उल्कापात हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. उल्कापात हे अचानक पडत असतात पण हे कृत्रीम उपग्रहाचे भाग असल्याचे खगोलशास्त्र अभ्यासक रवींद्र खराबे यांनी सांगितले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उपग्रहाचे अवशेष कोसळल्याची खगोलशास्त्रज्ञांना शंका
आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला. लाडबोरी ग्रामपंचायतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत लोळ कोसळला. त्या ठिकाणी 8 x 8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आढळून आली . सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आली असून तपासणीनंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या घटनेनंतर अनेक अफवांना पेव फुटले आहे नेमकं हे काय होतं आणि कशामुळे अशापद्धतीने उल्कापात सदृश्य अग्नीचा गोळा पृथ्वीच्या दिशेने आला आहे याचा गूछ जरी कायम असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. नेमकं काय कारण आहे आणि कशामुळे असा प्रकार घडला आहे हे अद्याप समजले नाही परंतु यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha