Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 11 मार्च 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, कृषी क्षेत्रात 4.4 टक्के,उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढीचा अंदाज, कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडं लक्ष
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
2. महाविकास आघाडी सरकार पडल्यास आम्ही पर्याय देऊ, गोव्यातील बंपर यशानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांचं वक्तव्य, 2024मध्ये पूर्ण बहुमताने विजयी होण्याचाही विश्वास
3. काही राजकीय पक्षांकडून केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचा प्रयत्न, उत्तर प्रदेशातून पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर अप्रत्यक्ष निशाणा
4. पाचपैकी चार राज्यातील बहुमतानंतर भाजपचं आज बैठकांचं सत्र, योगी आदित्यनाथ दिल्लीत जाणार तर उत्तराखंडमध्ये धामींच्या पराभवामुळे नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम
5. आजपासून पंतप्रधान मोदींकडून गुजरात निवडणुकांचं रणशिंग, सकाळी 10 पासून 4 लाखांच्या उपस्थितीत रोड शो, संध्याकाळी पंचायत संमेलनात शक्तीप्रदर्शन
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 11 मार्च 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
6. दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही आपची एकहाती सत्ता, सत्ताधारी काँग्रेससह अकाली दलाला झाडून काढलं, शहीद भगतसिंह यांच्या गावात शपथविधी सोहळा होणार
7. उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास
8. देशातील निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ नाही, तब्बल 4 महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर
9. नियंत्रण रेषा वादावर भारत आणि चीनमध्ये आज 15वी बैठक, चर्चेआधी चीनकडून सामंजस्याचे संकेत
10. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला; येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान स्पर्धेचं आयोजन, कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा निर्णय