एक्स्प्लोर

MahaRERA QR Code : गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड बंधनकारक

MahaRERA QR Code : 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.

MahaRERA QR Code : 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या (Housing Project) अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे हा क्यूआर कोड (QR Code) असणे अत्यावश्यक राहणार आहे, तसे परिपत्रक महारेराने (MahaRERA) नुकतेच जारी केले आहे. महारेराकडे मार्च अखेरपासून नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करुन दिलेले आहेत.

महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्या माहितीच्या बाजूलाच क्यूआर कोड ठळकपणे दाखवणं आवश्यक

विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती (Advertisement) करत असतात. कुठलेही माध्यम वापरुन केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा वेबसाईटसोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

प्रकल्पासंबंधित महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार!

या क्यूआर कोडमुळे घर खरेदी करणाऱ्यांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.

प्रपत्र 5 दरवर्षी प्रकल्पाच्या वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक

याशिवाय रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर 3 महिन्याला आणि 6 महिन्याला विविध प्रपत्रांमध्ये माहिती त्यांच्या वेबसाईटवर अपडेट करावी लागते. यातील प्रपत्र 5 अत्यंत महत्त्वाचे प्रपत्र आहे. हे दरवर्षी प्रकल्पाच्या वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात. हे सर्व यापुढे क्यूआर कोडमुळे घर बसल्या सहजपणे पाहता येणार आहेत.

हेही वाचा

राज्यात 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी, दिवाळखोरीची टांगती तलवार; गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी महारेराकडून यादी प्रसिद्ध

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs DC IPL 2025 : समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
Bangladesh : मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
Share Market : NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर, चौथ्या तिमाहीत नफा 22 टक्क्यांनी वाढला
NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर
Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी राजीनामा दिलेला त्यावेळी काय घडलेलं, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
शरद पवार यांचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या चर्चा, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report : Shiv Sena-MNS Alliance : युतीबाबत शिवसेना सकारात्मक, मनसे शंकितNilesh Chvhan Special Report  : बंदूकधारी निलेश चव्हाण फरार, वैष्णवीच्या छळात सहभाग असल्याची शंकाJyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पदChhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs DC IPL 2025 : समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
Bangladesh : मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
Share Market : NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर, चौथ्या तिमाहीत नफा 22 टक्क्यांनी वाढला
NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर
Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी राजीनामा दिलेला त्यावेळी काय घडलेलं, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
शरद पवार यांचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या चर्चा, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
EPFO : मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Embed widget