एक्स्प्लोर

राज्यात 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी, दिवाळखोरीची टांगती तलवार; गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी महारेराकडून यादी प्रसिद्ध

Maharashtra News: राज्यात 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी, दिवाळखोरीची टांगती तलवारगुंतवणूकदारांच्या माहितीसाठी महारेराकडून संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

Maharashtra Housing Projects: सर्वच प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेरानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी महारेरा विकासकांनी महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत केलेल्या माहितीची छाननी तर करतेच याशिवाय इतर स्त्रोतांमधूनही प्रकल्पस्थिती समजून घ्यायचा सातत्यानं प्रयत्न करते. अशी छाननी करताना महारेराकडे (MAHARERA) नोंदणीकृत असलेले तब्बल 308 प्रकल्प हे नादारी आणि दिवाळखोरीच्या (Insolvency and Bankruptcy) अनुषंगाने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या (National Company Law Tribunal- NCLT) संकेतस्थळावर असल्याचं आढळून आलं आहे.  

विविध बँका, वित्तीय संस्था या क्षेत्रातील पतपुरवठा करणारे इतर घटक यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत राज्यातील या 308 प्रकल्पांवर नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू केलेली आहे. यातील गंभीर बाब अशी, या 308 प्रकल्पांपैकी 115 प्रकल्प सध्या सुरू असलेले (Ongoing) असून  यातील 32 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. तर उर्वरित 193 प्रकल्प हे व्यापगत (Lapsed) असून यातील तब्बल 150 प्रकल्पांतही  50 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. सध्या सुरू असलेल्या 83 प्रकल्पांत आणि व्यापगत झालेल्या 43 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा कमी नोंदणी झाली असल्याचं दिसतं.

हे प्रकल्प महारेराकडे दर 3 महिन्याला प्रकल्पात किती नोंदणी खरेदी विक्री झाली (Inventory) याची माहिती अध्ययावत करत नसल्यानं हे प्रकल्प याही स्थितीत नवीन ग्राहक स्वीकारत आहेत का? हे स्पष्ट होत नाही. या व्यवहारात पारदर्शकता असावी आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना सावध करण्यासाठी महारेरानं ही सर्वसमावेशक यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ग्राहकांनी ही यादी बघून याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन महारेराच्या वतीनं ग्राहकांना करण्यात आलं आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती प्रकल्प? 

  • ठाणे जिल्हा : 100 प्रकल्प 
  • मुंबई उपनगर : 83 प्रकल्प 
  • मुंबई शहर : 15 प्रकल्प
  • पुणे जिल्हा : 63 प्रकल्प
  • पालघर जिल्हा : 19 प्रकल्प 
  • रायगड जिल्हा : 15 प्रकल्प 
  • अहमदनगर जिल्हा : 5 प्रकल्प 
  • सोलापूर जिल्हा : 4 प्रकल्प 
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा : 1 प्रकल्प
  • रत्नागिरी जिल्हा : 1 प्रकल्प
  • नागपूर जिल्हा : 1 प्रकल्प
  • सांगली जिल्हा : 1 प्रकल्प

308 प्रकल्पांपैकी 115 हे सुरू असलेले (On going) प्रकल्प आहेत. या सुरू असलेल्या प्रकल्पांत ठाणे भागातील 50, मुंबई उपनगर 31, मुंबई शहर 10, पुणे आणि रायगड प्रत्येकी 8, अहमदनगर 5, पालघर 2 आणि सोलापूरच्या एका प्रकल्पाचा यात समावेश आहे. यातील व्यापगत( Lapsed) प्रकल्पांची संख्या 193 असून यात पुणे 55, मुंबई उपनगर 52, ठाणे 50, पालघर 17, रायगड 7, मुंबई 5, सोलापूर 3, छत्रपती संभाजीनगर,  नागपूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी एक प्रकल्पाचा यात समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
Embed widget