सदावर्तेंच्या प्रॉपर्टीचं घबाड; घरात नोटा मोजण्याचं मशीन, केरळवरून भारदस्त कार घेतल्याचा सरकारी वकिलांचा दावा
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरातून ताब्यात घेतलेल्या हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयात सरकारी वकीलांमार्फत अनेक नवनवे खुलासे होताना बघायला मिळत आहे. अशात एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत जे पैसे सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतले यातून भायखळा आणि परळमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी कोर्टात व्यक्त केला आहे. तसेच सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे.
सरकार वकिल प्रदीप घरत म्हणाले, भायखळा आणि परळमध्ये त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. सोबतच गाडी देखील घेतली आहे. हे सर्व याच पैशातून घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी सदावर्ते यांची पोलिस कोठडी पाहिजे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि काही संशयास्पद कागदपत्र आणि वहीसुद्धा मिळाली आहे. सदावर्ते यांनी ॲफिडेव्हिटसाठी फॉर्म बनवला होता. 270 ॲफिटडेव्हिटसाठी आणि 15 रुपये तिकीटासाठी घेतले आहे. मात्र इतर पैसे लोकांना परत केले नाहीत. हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये पैसे 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख आहे. सोबतच पैसे मोजण्याच्या मशीनमधून 85 लाख रुपये मोजले आहेत. OLX वर जाहिरात पाहून सदावर्ते यांनी मोहम्मद रफी नावाच्या इसमाला संपर्क केला होता आणि त्यानंतर आठवड्याभरातच मोहम्मद रफीकडून एक आलिशान गाडी केरळवरुन खरेदी केल आहे त्यासाठी आरटीजीएसनं मोहम्मद रफी याला रु 23 लाख दिले गेले आहेत. यावर आरोपीचं म्हणणं आहे मी वकील आहे. मात्र ते 20 वर्षांपासून ते वकीली करतायत. या काळात त्यांनी प्रॉपर्टी घेतल्या. त्यामुळे हे संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करायचा आहे. काही 35 पेपर त्यांच्या घरातून जप्त केले आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी हवी आहे.
दरम्यान, यातील ज्या भायखळा मालमत्तेचा उल्लेख केलाय ती भायखळा स्टेशनच्या समोरच आहे. यावर सदावर्ते यांच्या कुटुंबातील सर्वांचा उल्लेख देखील आहे. सदावर्तेंनी पैसे जमा केलेत तर त्याचा विनियोग कसा केला हे तपासायचं आहे, त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :