(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Sharad Pawar : सावरकरांच्या काही हिंदुत्वाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नाही, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य
Nashik Sharad Pawar : सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवल पाहिजे, असे सुचक वक्तव्य शरद पवार यांनी केला.
Nashik Sharad Pawar : सावरकरांच्या (Veer Savarakar) काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली, ती मान्य नाही. पण सावरकरांनी पुरोगामी विचारही मांडले. जसे की त्यांनी घरासमोर मंदिर बांधले होते, त्या मंदिराचा पुजारी दलित वर्गातील होता. त्यामुळे सावरकरांबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपासून सावरकर यांच्या विषयी राजकारण तापले आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याचे बोलले जात आहे. यावर शरद पवार म्हणाले की, नाना पटोले पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांना त्यांचं मत आहे. प्रत्येकामध्ये मतभिन्नता असते. मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये चित्र दिसेल. सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती मान्य नाही. पण त्यांनी काही पुरोगामी विचार मांडले.
शरद पवार पुढे म्हणाले, जेपीसीबाबत प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. प्रत्येक पक्षाला एखाद्या प्रश्नावर स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. प्रत्येकाचे मत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहे. मात्र आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे. दुसरीकडे जिल्ह्यात , राज्यभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवल पाहिजे, असा सल्लाही अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. एकीकडे सर्व मंत्रीमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. मात्र आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हिंदुत्वाची भूमिकेवर म्हणाले की, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, ते लोक अशी भूमिका घेतात. आज अतिवृष्टी, शेती नुकसान याचा विचार सरकार नाही. लोकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे यावर भूमिका घेणं महत्वाचं आहे. तसेच ते पुढे म्हणाले की संसदेत खासदारांनी काय बोलावे, यावर वेगवेगळी मतं असू शकतात. चौकशी झाली पाहिजे, पण जेपीसी योग्य नाही. कारण लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार यावर त्याची रचना ठरते. यात सत्ताधारी लोकांचे बहुमत असते. पण जर सगळ्या विरोधकांची भूमिका असेल तर जेपीसी चालवा, माझा विरोध नाही. पण जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश चौकशी योग्य असेल.
कर्नाटक विधानसभेत भाजपचा पराभव?
दरम्यान शरद पवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. माझं स्पष्ट मत आहे की, कर्नाटक मध्ये भाजपचा पराभव होईल, काँग्रेस सत्तेत येईल. काही ठिकाणी आमचे उमेदवार असतील. तसेच काही दिवसांपासून ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा सुरू यावर ते म्हणाले की, आमची जी तक्रार आहे, ती खरी नाही, हे दाखविण्यासाठी आयोग कधी अशी भूमिका घेते की, माझ्या मतदारसंघात काही चुकीचं करणार नाही. प्रश्न असा आहे की, जी चीप टाकतात, त्यावर काही तज्ञ लोकांना शंका आहे. यावर आम्ही काही प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाला दिले. आमची शंका दूर करा, आमची काही तक्रार नाही. पण जर तशीच निवडणूक घेतली, तर आमची शंका असल्याचे शरद पवार म्हणाले.